आता कोर्टाची पायरी ऑनलाईन चढावी लागणार, कोरोनाचा न्यायव्यवस्थेवर मोठा परिणाम

साम टीव्ही
रविवार, 26 जुलै 2020
 • आता ऑर्डर ऑर्डरही ऑनलाईन
 • कोर्टाची पायरी ऑनलाईन चढावी लागणार
 • कोरोनाचा न्यायव्यवस्थेवर मोठा परिणाम

कोरोनाच्या काळात सगळंच बदललं. शाळांपासून कॉलेजपर्यंत सगळंच ऑनलाईन झालं. आणि आता तर कोर्ट सुद्धा ऑनलाईन होणार आहे... म्हणजेच न्यायही घरबसल्या मिळू शकेल.

कोरोनामुळे सगळंच बदललंय.. अशात न्यायव्यवस्थाही बदलतेय.. येत्या काळात न्यायव्यवस्थाही ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे ऑर्डर ऑर्डर हे शब्दही कदाचित ऑनलाईनच तुमच्या कानी पडतील. एकूणच काय तर कोर्टाची पायरी ऑनलाईनच चढावी लागेल. अशातच आता नाशकात देशातलं पहिलं ई कोर्ट सुरु होतंय.  

कोर्टाचं काम म्हणजे वेळखाऊ काम, अशी आजवर सर्वसामान्यांची धारणा.. मात्र आत कोर्ट ऑनलाईन झालं की काय बदल होतील? तर यातले काही ठळक मुद्दे बघू यात. 

- आता 'ऑर्डर... ऑर्डर...' ऑनलाईन 

 • नाशिकमधून ई-कोर्टची सुरुवात होतेय 
 • ऑनलाईन पक्षकाराची बाजू मांडता येणार
 • कायदेशीर युक्तिवाद, पुरावे सादर करणं ऑनलाईन
 • दावा आणि कागदपत्रं दाखल कऱणंही ऑनलाईन
 • वकिलांना सर्व काम आपल्या कार्यालयांतून करता येणार
 • वेळ आणि श्रम यांचीही बचत होईल
 • न्यायालयीन कामकाज गतिमान होण्याची शक्यता
 • कोरोनामुळे सगळंच ऑनलाईन होत असताना, न्यायव्यवस्था ही ऑनलाईन होणं हे कदाचित अनेकांसाठी वेळ वाचवणारंही ठरु शकेल... मात्र यालाही मर्यादा येतीलच.. मात्र सध्यस्थितीत हा पर्याय अनेकांसाठी दिलासा देणारा असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live