माणसाचा इतिहास हाच मुळी युद्धांनी भरलेला आहे. प्राचीन काळापासून शत्रुचा विनाश करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या, वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर केला गेलाय. एकवेळ शस्त्रांनी लढलेलं युद्ध परवडलं पण जैविक युद्ध कधीही घातक. या जैविक युद्धाला नेमकी कुठून सुरवात झाली. त्याचा शोध कुणी लावला? हे इतिहासाची पानं चाळल्यानंतर लक्षात येईल.
एका माहिती नुसार ब्रिटननं सर्वात आधी अमेरिकेविरोधातल्या युद्धात जैविक हत्याराचा वापर केल्याचं सांगण्यात येतं.
वर्ष 1763 रेड इंडियन्सविरोधात जैविक अस्त्र
व्या शतकात कॅनडावर कब्जा मिळवण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात युद्ध सुरू होतं. त्यावेळी अमेरिकेतल्या मुलनिवासी लोकांनी फ्रान्सला पाठिंबा दिला.त्यावेळी ब्रिटननं स्मॉलपॉक्स नावाचा व्हायरस सोडला. ज्यामुळे महामारी पसरून अमेरिकेतील अनेक मुलनिवासी मारले गेले. अमेरिकेतील ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी रेड इंडियन्सना मारण्यासाठी प्लेग, कांजण्या, चेचकच्या विषाणूंनी भरलेल्या गोधड्या वापरायला देऊन त्यांना ठार केलं होतं.
पहिलं महायुद्ध
तर पहिल्या महायुद्धात जर्मनीनं अँथ्रॅक्स, ग्लॅन्डर्स, कॉलरा, प्लेगच्या विषाणूंचा मारा रशियातील सेंट पिटर्सबर्गवर केला होता.
पहिल्या युद्धानंतर लीग ऑफ नेशन्सनं जैविक अस्त्रांच्या वापरावर बंदी घालणार्या जिनेव्हा प्रोटोकॉलला मान्यता दिली. तरी देखील दुसर्या महायुद्धात जर्मनी, जपान, ब्रिटन, अमेरिका यांनी प्लेग, सिफिलिस, पॅरालिसिस आणणार्या बोटुलिनम टॉक्सिनचा मुक्तपणे वापर केला.
दुसर्या महायुद्धानंतर तब्बल 22 वर्षांनी संयुक्त राष्ट्र संघानं बायोलॉजिकल वेपन्स म्हणजेच जैविक हत्यारांच्या निर्मितीवर तसच वापरावर पूर्णता बंदी घातली. जवळपास 179 देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मात्र जैविक हल्ला किंवा रोगाची साथ आल्यास त्यावर उपाय शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांना डिफेन्सिव्ह रिसर्च करण्याची मुभा दिली. याचा फायदा घेऊन अमेरिकेनं व्हिएतनाममध्ये एजन्ट ऑरेंज आणि इराकमध्ये डिपलीटेड युरेनियमचा वापर केला.
वर्ष 1932 जपानचा चीनवर जैविक हल्ला
जैविक हल्ल्याचा इतिहास जाणून घेताना जपानचं क्रोर्य दुर्लक्षून चालणार नाही. 1932 मध्ये जपाननं चीनवर जैविक हल्ला केला. एका विमानातून प्लेगचा विषाणू चीनच्या हद्दीत सोडण्यात आला. इतकच नाही तर 1940च्या सुरूवातीला जपाननं टायफाइड, कॉलरा, प्लेग, अँथ्रेक्स अशा अनेक आजारांना आमंत्रण देणाऱ्या जिवणुंची निर्मिती करून त्याचा चीनी कैद्यांवर प्रयोग केला. हे विषाणु सोडण्यासाठी जिवंत चीनी कैद्यांची चिरफाड करण्यात आली.
वर्ष 1968 विषप्रयोगामुळे 6 हजार मेंढ्यांचा मृत्यू
ही घटना आहे 1968 सालातली जेव्हा अमेरिकेतल्या डुगवेतल्या स्कल व्हॅलीत 6 हजार मेँढ्या मृत्युमुखी पडल्या. या मेंढ्याच्या मृत्युमागचं कारण होतं. युनायटेड स्टेट्स आर्मीच्या केमिकल आणि बायोलॉजिकल वॉरफेअरचा कार्यक्रम रासायनिक शस्त्रांची चाचणी सुरू असताना या मेंढ्या मारल्या गेल्या. त्यामुळे अमेरिकेचं पितळ जगासमोर उघडं पडलं.
जैविक युद्ध हे जगाला परवडणारं नाही हे माहित असूनही अनेक देशांनी या युद्धाला खतपाणी घेतलीय. ज्याची फळं आजही लाखो निरपराधांना आजही भोगावी लागतायेत.