धक्कादायक! कोरोनाचं सावट आणखी 4 महिने राहणार, लॉकडाऊनचा कालावधी वाढणार?

साम टीव्ही
शनिवार, 28 मार्च 2020

देशातील कोरोना संसर्गाची व्‍याप्‍ती दिवसेंदिवस वाढतेच आहे. हे याच वेगाने सुरु राहिलं तर देशामागचा कोरोना विषाणूचा फेरा संपण्‍यासाठी किमान चार महिने लागतील.

कोरोनाबाबत आता एक धक्कादायक अहवाल आला आहे. कोरोनाचं सावट तब्बल 4 महिने राहणार आहे. शिवाय एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना देशात सर्वाधिक पसरेल अशी शक्यता या अहवालात वर्तवण्यात आलीय. तब्बल 25 लाख लोकांना कोरोनामुळं दवाखान्यात जावं लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. जॉन हापकिन युनिव्हर्सिटी आणि द सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक या 2 संस्थांना हा अहवाल तयार केलाय. जगभरातली कोरोनाची परिस्थिती आणि सध्याचा वातावरण याची तुलना करुन हा अहवाल तयार करण्यात आलाय. ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनाचं सावट राहणार आहे. त्यानंतर कोरोनाचा धोका कमी होईल अशी आशा या अहवालात वर्तवण्यात आलीय.

पाहा सविस्तर व्हि़ीडीओ -

देशातील कोरोना संसर्गाची व्‍याप्‍ती दिवसेंदिवस वाढतेच आहे. हे याच वेगाने सुरु राहिलं तर देशामागचा कोरोना विषाणूचा फेरा संपण्‍यासाठी किमान चार महिने लागतील. ही शक्‍यता जॉन हापकीन युनिव्‍हर्सिटी आणि द सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्‍स, इकॉनॉमिक्‍स अँड पालिसी या दोन संस्‍थांनी वर्तवलीय. या दोन्‍ही संस्‍थांनी एक संयुक्‍त अहवाल तयार केला असून त्‍यात ही शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात आलीय. देशभरातील विविध संकेतस्‍थळांवरील माहितीचा आधार घेऊन हा अहवाल तयार केला गेलाय. या अहवालानुसार कोरोना विषाणूचा फेरा जुलैच्‍या अखेरपर्यंत किंवा ऑगस्‍टच्‍या मध्‍यापर्यंत कायम राहू शकतो.

Web Title - marathi news  Corona's suit will last for another 4 months


संबंधित बातम्या

Saam TV Live