अमेरिकेत परिस्थिती गंभीर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांहून आधिक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 मार्च 2020

अमेरिकेनं कोरोनाच्या बाबतीत इटलीलाही मागे टाकलंय. सध्या लांखोंनी कोरोनाग्रस्त रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. दरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यात येतायत. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येतेय. 

अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. अमेरिकेत गेल्या 24 तासात 18 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांहून आधिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता जगातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण अमेरिकेत झालेत. इटलीला देखील अमेरिकेनं मागे टाकलंय. तर राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑटोमोबाईल कंपन्यांना जास्तीत जास्त व्हेंटिलेटर तयार करण्याचे आदेश दिलेत. 

अमेरिकेत एका आठवड्यापूर्वीच बाधितांची संख्या आठ हजार होती. यावरून अमेरिकेत विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचे चित्र आहे. एकूण रुग्णांपैकी दोन हजार जणांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णांची तपासणी वेगाने सुरु असल्याने त्यांची संख्या वाढल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील मित्रदेशांच्या सहकार्याने काम सुरु असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. आज जी-२० देशांच्या बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

वाचा जगात कोरोनामुळे कुठे काय परिस्थिती 

  • - इटलीमध्ये एकाच दिवशी 662 जणांचा मृत्यू 
  • - रशियामध्ये शनिवारपासून हॉटेल जूनपर्यंत बंद 
  • - दक्षिण आफ्रिकेत लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर लष्कराची मदत 
  • - फ्रान्समध्ये एकाच दिवशी 365 जणांचा मृत्यू 
  • - ब्रिटनमध्ये एकाच दिवशी 115 जणांचा मृत्यू 
  • Web title - coronavirus critical situation us over 70 thousand patients


संबंधित बातम्या

Saam TV Live