यंदाची IPL स्पर्धा होणार की नाही ? मोठं प्रश्नचिन्हं

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 मार्च 2020

भारत आणि अफ्रिका यांच्यातील धर्मशाळा इथला पहिला सामना काल रद्द झाला. तर, लखनौ आणि कोलकाता येथील सामने प्रेक्षकांविना खेळवले जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत आता आयपीएलच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळं आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिल कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. 

मुंबई - भारतातील सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या आयपीएलवर यंदा प्रश्नचिन्ह उभं आहे. कोरोनाच्या व्हायरसचं संपूर्ण जगापुढं संकट उभं राहिलं असताना आता आयपीएल होणार की नाही यावरून उलट- सुलट चर्चा सुरू आहेत. येत्या शनिवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे. त्यात बैठकीत यंदाच्या आयपीएलचं भवितव्य ठरणार आहे.

हे ही वाचा - BREAKING | कोरोनोमुळे कर्नाटकात पहिला बळी  

नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण!
जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया या देशांमध्ये मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे बळी गेले आहेत. भारतातही, कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने स्पर्धा रद्द करणे शक्य नसेल तर, प्रेक्षकांविना सामने आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या दक्षिण अफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर आहे.

भारत आणि अफ्रिका यांच्यातील धर्मशाळा इथला पहिला सामना काल रद्द झाला. तर, लखनौ आणि कोलकाता येथील सामने प्रेक्षकांविना खेळवले जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत आता आयपीएलच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळं आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिल कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. 

हे ही वाचा - सहा हजार भारतीय इराणमध्ये अडकले  

कर्नाटक सरकारचा आयपीएलला विरोध
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचं संयोजन करू नका, असं आवाहन कर्नाटक राज्य सरकारनं केलंय. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारही आयपीएल आयोजित करण्यात फारसं उत्सुक नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अनेकदा भूमिका स्पष्ट केलीय. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेक्षकांविना आयपीएल खेळवा, असा पर्याय सुचवला आहे. पण, हा पर्याय कितपत शक्य आहे, यावरून शंका उपस्थित केली जात आहे.

मैदानावर प्रेक्षक आले नाही तर, प्रत्येक टीमच्या फ्रॅंचायझीला गेट मनीवर पाणी सोडावं लागणार आहे. ही रक्कम साधारण 20 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आता हे नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसीआय कोणतं पाऊल उचलणार, हे पहावं लागणार आहे. त्यातच पुढं 18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात आयसीसीचा टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे. त्यासाठी खेळाडूंना तयारी करावी लागणार आहे. खेळाडू किंवा त्यांचे देश वर्ल्ड कपच्या तोंडावर कोणता धोका घेतली का? याविषयीही शंका आहे. 

आयपीएलसाठी थोडक्यात महत्त्वाचे

  • प्रेक्षकांशिवाय आयपीएल झाल्यास टीम फ्रँचायजीचे सुमारे 20 कोटी रुपयांचे होणार नुकसान 
  • एका सामन्याच्या निमित्ताने पाच ते 20 हजार जणांना मिळत रोजगार
  • आयपीएल किती दिवस पुढे ढकलायची? गव्हर्निंग कौन्सिलपुढे असणार पेच 
  • आयपीएल होणारच, असे म्हणणारा सौरभ गांगुली आता कोणती भूमिका घेणार?
  • बीसीसीआय कोणताही धोका घेण्यास तयार नाही!
  • Web Title Coronavirus Impact Ipl Uncertainties Government Council Meeting


संबंधित बातम्या

Saam TV Live