कोरोनावर आली गोळी, किंमत 103 रुपये, कोरोनावरच्या गोळीचं मुंबईत उत्पादन

कोरोनावर आली गोळी, किंमत 103 रुपये, कोरोनावरच्या गोळीचं मुंबईत उत्पादन

मुंबईतील ग्लेनमार्क फार्मासुटिकल्स या कंपनीला कोरोनावरील उपचारासाठीची गोळी तयार करण्याची परवानगी मिळालीये. DCGI म्हणजेच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मुंबईस्थित ग्लेनमार्कला ही परवानगी देऊ केलीये.

या कंपनीत उत्पादित करण्यात येणाऱ्या गोळ्या या कोरोनाची प्राथमिक लक्षणं असणाऱ्यांना देण्यात येणार आहेत. अँटिव्हायरल औषध असणाऱ्या व्हिपिरावीरला फॅबिफ्लू या नावाने मार्केटमध्ये आणलं जाणार आहे. दरम्यान बाजारात आणण्याआधी १ हजार रुग्णांवर त्याचा प्रयोग करून पहिला जाणार आहे. देशातील प्रत्येकाला सहजतेने हे औषध उपलब्ध होऊ शकेल. या 'फॅबिफ्लू'च्या एका गोळीची किंमत १०३ रुपये असणार आहे. 

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलंय. या विषाणूने आतापर्यंत 4 लाख 62 हजार नागरिकांचा बळी घेतला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 87 लाख 56 हजारावर पोहोचली असून आतापर्यंत 46 लाख 24 हजार रुग्ण बरे झालेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश या विषाणूविरोधात लढत आहेत. दरम्यान या विषाणूला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय.

औंरगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचे 102 नवे रुग्ण आढळून आलेत. यामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 340 वर पोहचलीय. या पैकी 1 हजार 781 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सध्या 1 हजार 380 रुग्णांवर औरंगाबादमधल्या विविध रुग्णांवर उपचार सुरू आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 179 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

यासह, नागपूरात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासात 63 संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागपूरात
कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 205 वर पोहोचली आहे. तर  18 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यु झालाय. पण 824 रुग्णांनी कोरोनावर मात  केल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com