BIG BREAKING | नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेची आत्महत्या

साम टीव्ही
बुधवार, 15 एप्रिल 2020

मुंबईच्या नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेने आत्महत्या केल्याची मोठी बातमी समोर येतेय. बाथरूम मध्ये महिलेने आत्महत्या केली असल्याचं कळतंय. 

मुंबईच्या नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना ग्रस्त महिलेने आत्महत्या केल्याची मोठी बातमी समोर येतेय. बाथरूम मध्ये महिलेने आत्महत्या केली असल्याचं कळतंय. 

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होतोाना दिसतेय अशातच अशा विचीत्र घटनांमुळे भीती आणखीनच वाढलीय. सरकार आपल्या परीने परिस्थिती हाताळण्याचं काम करतंय मात्र परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतेय. याआधीही एका कोरोना रुग्णाने मानेवर ब्लेडने वार करुन आत्महत्या केली होती. ती घटना आसाममध्ये घडली. आणि ही घटना ताजी असतानाच आता मुंबईमध्येसुद्धा हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. 
नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेनं मध्यरात्री आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येतेय. या महिलेने नैराश्यैच्या कारणांमुळे आत्महत्या केल्याचं समजतंय. नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच या महिलेने आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुंबईत दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. गजबजलेल्या अशा दादर मध्ये कोरोनाचे  2 नवे रूग्ण आढळलेत. एका 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेला आणि ऐकोणसत्तर वर्षीय ज्येष्ठ पुरुषाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे दादरमधील कोरोना रुग्णांचा आकडा हा 21वर गेलाय. तर इकडे माहीममध्येही कोरोनाचा एक रुग्ण वाढलाय. माहिमच्या प्रकाश नगर परीसरात राहणाऱ्या एका 55 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे माहीमध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण 7 झालेत. 

धारावीमध्ये एकाच दिवसात 5 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 60वर गेलाय. तर धारावीमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईतील धारावी कोरोनाचं हॉटस्पॉट ठरली आहे. त्यातच अशा आत्महत्येच्या घटनांमुळे अधिकच चिंता वाढलीय.

 Web title -  marathi news Coroner suffers Woman suicide in bath at Nair Hospital

 


संबंधित बातम्या

Saam TV Live