बोंडअळी प्रभावीत शेतक-यांना मिळणार ३ हजार ४८४ कोटी रुपये नुकसान भरपाई

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 मे 2018

2017 च्या खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोग प्रभावीत पिकांच्या शेतक-यांना अखेर राज्य शासनाने मदत देण्याबाबातचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यानुसार एकुण ३ हजार ४८४ कोटी रुपये रक्कम शेतक-यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तीन समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कापसाला बोंड अळी लागल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातच विषारी किटक नाशक फवारणीमुळे सुमारे 30 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुर यांचा मृत्यु झाला होता.

2017 च्या खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोग प्रभावीत पिकांच्या शेतक-यांना अखेर राज्य शासनाने मदत देण्याबाबातचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यानुसार एकुण ३ हजार ४८४ कोटी रुपये रक्कम शेतक-यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तीन समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कापसाला बोंड अळी लागल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातच विषारी किटक नाशक फवारणीमुळे सुमारे 30 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुर यांचा मृत्यु झाला होता. तर धान पिकाला तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठा फटका विदर्भातील शेतक-यांना बसला होता. कापूस किंवा धानाचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक-यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live