प्रेमीयुगुलाला मुलीच्या कुटुंबीयांची बेदम मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 एप्रिल 2019

बुलडाणा : एका प्रेमीयुगुलाला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. 16) नांदुरा बस स्थानकात घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमानुषपणे मारहाण करण्यात आलेल्या या घटनेची पोलिसात तक्रार नसल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अप-डाऊन करतात यातील एक विद्यार्थिनी मंगळवारी दुपारी आपल्या मित्रासोबत नांदुरा येथीलच बस स्थानकावर गप्पा मारत होती. याची माहिती तिच्या कुटुंबियातील मंडळींना मिळाली. मंडळींनी बस स्थानकातून गाठून दोघांना रंगेहात पकडले आणि तेथेच त्यांना बेदम मारहाण केली.

यानंतर मुलीकडील मंडळी तिला घेऊन निघून गेले. या घटनेचे बघ्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये चित्रीकरण केले तर काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याची चर्चा नांदुरा शहरात होत आहे.

Web Title: couple beaten by family at Nandura Buldana

संबंधित बातम्या

Saam TV Live