रात्री 11.30 पर्यंत डान्सबार सुरू ठेवता येणार; राज्यात पुन्हा सुरू होणार छमछम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 जानेवारी 2019

13 वर्षांपूर्वी बंद झालेले डान्सबार आता पुन्हा सुरू होणार आहेत. डान्स बारचा परवाना मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अतिशय कडक अटी लागू केल्या होत्या.  मात्र त्या व्यवहार्य नसल्याचं सांगत कोर्टानं या अटी रद्द केल्या त्यामुळे छमछमचा मार्ग मोकळा झालाय. अर्थात डान्सबारला परवानगी देताना कोर्टानं राज्य सरकारच्या काही अटी मात्र कायम ठेवल्या आहेत. हे डान्सबार संध्याकाळी सहा ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. शिवाय बारबालांवर पैसे उडवता येणार नाहीत. 

डान्स बार सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 2005 साली नियमावली जाहीर केली होती. या अटी इतक्या जाचक होत्या की त्यांची पूर्तता होणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळं सरकारच्या नियमावलीनंतर मागील 13 वर्षांत एकाही डान्स बारला परवानगी मिळू शकली नव्हती. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व डान्स बार बंद झाले...पण आता कोर्टाच्या निर्णयामुळे सरकारलाही एक पाऊल मागे सरकावं लागलंय. 

अर्थात कोर्टाच्या निर्णयानंतरही डान्सबार इतक्या सहजसहजी सुरू होणार नाहीत असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळेंनी व्यक्त केलाय. तर महिला वर्गानंही डान्सबार सुरू होण्याला नापंसती दर्शवलीय. 

डान्सबारच्या नादापायी अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तरूणाई वाममार्गाला लागली. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात आर.आर.पाटील यांनी डान्सबारबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाचं त्यावेळी खुप कौतुकही झालं पण आता पुन्हा एकदा छमछम सुरू होतीय. या 13 वर्षात महाराष्ट्र बराच पुढारलाय. आता हे पुढारलेपण नेमकं कशाबाबतीत आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. 

WebTitle : marathi news court lifts ban of dance bars in maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live