व्हॉट्स अॅपवर येणार न्यायालयाचा निकाल 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

घरगुती हिंसाचार प्रकरणात निकालाची प्रत व्हॉट्स अॅपवर पाठवण्यावर न्यायलयाने शिक्कामोर्तब केले आहे. दिल्लीतील महिला कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात पत्नीचा छळ करणाऱ्या पतीला आणि त्याच्या नातेवाईकांना व्हॉट्स अॅपद्वारे निकाल पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

एकीकडे व्हॉट्स अॅप किंवा इतर सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक मेसेजस मुळे त्यावर निर्बंध आणावेत अशी मागणी होत असतानाच न्यायालयाने दिलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेतील हा बदल ऐतिहासिक आहे.

पीडित महिलेने तिच्या तक्रारीत घरातल्यांकडून शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणातल्या निकालाची प्रत या महिलेच्या पतीला आणि इतर नातेवाईकांना व्हॉट्स अॅप द्वारे पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live