VIDEO | कोरोनापासून वाचण्यासाठी गोमूत्र पार्टी, गोमुत्राने खरंच कोरोना बरा होतो?

अमोल कविटकर
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यात हिंदु महासभाही मागे राहिलेली नाही. कोरोनाला पळवून लावण्यासाठी हिंदू महासभेनं चक्क गोमुत्र पार्टीचं आयोजन केलंय. पण खरंच गोमुत्रानं कोरोना बरा होतो का?

कोरोनामुळे जग धास्तावलंय. कोरोनावर लस शोधण्यासाठी सगळीकडे संशोधन सुरंय. तर हिंदू महासभेनं मात्र गोमुत्र पार्टीचं आयोजन कोलंय. कोरोनापासून वाचायचं असेल तर गोमुत्र प्या. असा संदेश देणारा हिंदू महासभेचा एक व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. पुन्हा एकदा ऐका हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणी काय सांगतायेत.

कोरोना व्हायरसला पळवून लावण्यासाठी दिल्लीत या गोमुत्र पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विश्वशांती होमहवन देखील करण्यात आलं. या पार्टीला जवळपास 200 जणांची हजेरी लावली होती. 

 हिंदु संस्कृतीत गोमुत्राला खुप महत्व आहे. गोमुत्रात अनेक उपयोगी तत्व आहेत. मात्र कोरोनासारख्या व्हायरसवर मात करण्यासाठी कोरोना खरोखरच कितपत उपयोगी आहेत. हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. 

 देशी गायीच्या गोमुत्रात औषधी गुणधर्म असतात हे मान्य. पण गोमुत्र प्यायल्यानं कोरोनाची बाधा होत नाही हे कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे अशा गोमुत्र पार्टीनं कोरोना व्हायरसचा धोका खरोखरच टळेल का? हा प्रश्नच आहे. 

WEB TITLE - MARATHI NEWS  Cow urine party to avoid Corona 


संबंधित बातम्या

Saam TV Live