त्या नराधमांचा खात्मा करणारा हाच तो शूर अधिकारी

त्या नराधमांचा खात्मा करणारा हाच तो शूर अधिकारी

हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आलं होतं. आणि अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. यानंतर त्या आरोपींना ताब्यातही घेण्यात आलं त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली मात्र तरीही त्या आरोपींना कोर्टाकडून, प्रशासनाकडून काहीही गंभीर दखल घेतली जात नव्हती. या आधी सुद्धा अनेकदा अशा बल्त्काऱ्यांना प्रशासन पोसतंय. आणि आता पुन्हा अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनीच एक महत्वाचा आणि टोकाचा निर्णय घेतलाय. त्या नराधमांना चक्क गोळ्या घालून ठार केलंय. आता हा प्लॅन मर्डर आहे की खरंच एनकाउंटर हो कळेलंच. मात्रा आता एनकाउंटर करणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्याचं सर्व स्तरावरुन कौतुक होतंय. लोकांकडून त्यांच्या या कृत्याचा आदर केला जातोय. तर काही लोकांनी कायदा हातात घेतल्यानं त्यांच्यावर टीका केलीय. तर हे एनकाउंटर करणारे अधिकारी पोलिस आयुक्त व्हीसी सज्जनार यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया...

व्हीसी सज्जनार हे एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी यापूर्वी 2008मध्ये वरंगळ येथे झालेल्या ऍसिड हल्ल्यातील आरोपींचादेखील असाच खात्मा त्यांनी केला होता. तसंच आज पहाटे तीन वाजता त्यांनी दिशा केसमधील चारही आरोपींना गोळ्या घालून ठार केलंय. आणि यामुळे नक्कीच देशाला नवी 'दिशा' मिळवून दिली आहे. 

एनकाउंटर झालं कसं?

या चारही आरोपींनी ज्या ठिकणी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील पीडितेवर बलात्कार केला होता, त्याठिकाणी त्यांना घटनास्थळाची पुर्नबांधणी करण्यासाठी नेण्यात आलं होतं. त्याचवेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हाच प्रयत्न थांबवताना व्हीसी सज्जनार यांनी त्यांचं एन्काऊंटर केलं.

कोण आहेत व्हीसी सज्जनार?
व्हीसी सज्जनार हे 1996च्या आयपीएस बॅचचे आहेत 
सज्जनार यांनी मार्च 2018मध्ये सायबराबादच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतली 
महिला आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची दिली होती ग्वाही
एन्काऊंर स्पेशलिस्ट म्हणून, सज्जनार यांची आंध्र प्रदेश, तेलंगणमध्ये ओळख 

सज्जनार यांचा इतिहास तरुणींसाठी लढा देणारा

आंध्र प्रदेशात याआधी सज्जनार यांनी असंच एनकाउंटर केलं होतं. त्याचं कारण होतं, एका इंजिनीअरिंगच्या तरुणीवर तिघा तरुणांनी केलेला ऍसिड हल्ला. त्या तिघांचा सज्जनार यांनी खात्मा केला होता. त्याचवेळी ते चांगलेच प्रकाशझोतात आले होते. आणि त्या एन्काउंटरवरून मोठे वादही उफाळून आले होते. पोलिस कायदा हातात घेत असल्याची टीका सच्चनार यांच्यावर झाली होती. आता सुद्धा अशाच प्रकारची टीका त्याच्यावर होतेय. मात्र, नागरिकांकडून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतोय जो त्यावेळी सुद्धा त्यांना मिळाला होता. तरुणींसाठी तर ते हिरोच ठरले होते. त्या एन्काउंटरनंतर संबंधित तरुणीच्या कॉलेज परिसरात फटाके आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला होता. संबंधित तरुणीच्या मैत्रिणीनींनी सज्जनार यांची भेट घेऊन त्यान पुष्पगुच्छ दिले होते. मिठाई भेट दिली होती. आता सुद्धा काही महिलांना त्यांना राखी बांधून त्यांच्या कृत्याचे कौतुक केलेय.

हे ही पाहा - https://youtu.be/JPgSHtP6UWM 

Man behind the operation - Encounter Specialist CP Sajjanar. He previously deal with warangal acid attack encounter and now disha case encounter.

We must appreciate his guts , dashing moves. #Hyderabad #hyderabadpolice pic.twitter.com/yF9z1q30HW

— Ganapathi Varma (@vinayvarma1999) December 6, 2019

It’s the Great news for all of us. No more Tarikh pe Tarikh.#hyderabadpolice has done a fantastic job .
Salute to this man V. C Sajjanar IPS. who has done this #Encounter. The real Hero of 1.3 billions people. #DishaCase pic.twitter.com/w0p59Ixo6u

— JISHAN (@iamsrkJishan_) December 6, 2019

2008: Warangal Acid attack perpetrators killed in an #Encounter
2019: Hyderabad #DishaCase perpetrators killed in an #Encounter

Name: VC Sajjanar
Job: Delivering Justice, one bullet at a time.#JusticeForDisha pic.twitter.com/81M3nqfNav

— Jaswitha (@jaswitha_jassu) December 6, 2019

Web Title: CP Sajjanar mastermind of hyderabad rape case accuseds encounter

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com