#CWC19 | शिखर आणि भूवी नंतर विजय शंकरला दुखापत  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जून 2019

भारताची विश्वचषकात दमदार कामगिरी सुरु असतानाच एका बाजूला भारतीय संघाला दुखापातींना सामोरं जावं लागतंय. आधी शिखर धवन, त्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि आता विजय शंकर.

भारतीय संघातील ऑलराउंडर विजय शंकर सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याची माहिती मिळतेय. PTI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नेट मध्ये सराव करताना जसप्रीत बुमराहचा यॉर्कर चेंडू विजय शंकरच्या पायला लागला आहे. त्यामुळे विजय शंकर दुखापतग्रस्त झाला असल्याचं समजतंय. 

पाकिस्तानविरुद्ध खेळताना विजय शंकरने भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला होता आणि महत्त्वाच्या विकेट्स देखील पटकावल्या आहेत. दरम्यान, बुमराहच्या गोलंदाजीवर विजय शंकरला झालेली दुखापतही गंभीर नसल्याचंही सूत्रांकडून समजतंय. 

WebTitle: marathi news cricket world cup 2019 vijay shankar injured on the yorker ball of bumrah  

संबंधित बातम्या

Saam TV Live