फेक अकाउंटद्वारे महिलांना अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर आता कडक कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

मुंबई - सोशल मीडियावर डमी अकाउंटद्वारे अभिनेत्री आणि महिलांना अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली.

सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत केतकीने तिला फेसबुकवर अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांची माहिती दिली आहे. याप्रकरणी ट्रोलरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभाध्यक्ष विजय औटी यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या वेळी फडणीस यांनी सोशल मीडियावर डमी आणि खोट्या अकाउंटवरून अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करण्यासाठी पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांना तत्काळ सूचना दिल्या आहेत. तसेच, डमी अकाउंटद्वारे महिलांचा विनयभंग करणाऱ्यांवर कडक करवाईचे आश्वासन दिल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. या शिष्टमंडळात केतकी चितळेसह अभिनेता दिगंबर नाईक, सुशांत शेलार, प्रकाश वालावलकर होते. शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले.

Web Title: Crime on Dumy Social Account Chief Minister
 
संबंधित बातम्या

Saam TV Live