दुचाकीचे हप्ते फेडण्यासाठी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात संघवी यांची हत्या

दुचाकीचे हप्ते फेडण्यासाठी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात संघवी यांची हत्या

मुंबई : कर्जावर घेतलेल्या दुचाकीचे हप्ते फेडण्यासाठी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात सिद्धार्थ संघवी यांची गळा चिरून हत्या केल्याची कबुली 20 वर्षीय आरोपी रईस उर्फ सर्फराज शेख याने सोमवारी दिल्याचा दावा पोलिसांनी केला. एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष असलेल्या संघवींची कार नवी मुंबईतील कोपरखैरणेत आढळून आल्याने गूढ निर्माण झाले होते.

न्यायालयाने सर्फराजला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संघवी बेपत्ता असल्याची बातमी प्रसारमाध्यमांत आल्यावर त्यांचे कुटुंबीय पोलिसांची मदत घेतील, अशी भीती सर्फराजला वाटली. हे प्रकरण निवळण्यासाठी त्याने संघवी यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून त्यात दुसरे सिमकार्ड टाकले. त्यावरून संघवी कुटुंबीयांना "सिद्धार्थ सर सुखरूप आहेत, काळजी करण्याची गरज नाही' असे सांगून फोन कट केला. नेमका याच फोनमुळे सर्फराज पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

पोलिसांनी हस्तगत केलेल्या संघवी यांच्या गाडीवरही सर्फराजच्या हाताचे ठसे, रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती परिमंडळ-3 चे उपायुक्त अभिनाश कुमार यांनी दिली. मूळचा नवी मुंबईचा रहिवासी असलेला सर्फराज हा संघवी यांचे कार्यालय असलेल्या लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्येच बिगारीकाम करायचा. तेथील वाहनतळावर दोघांची तोंडओळख झाली होती.

WebTitle : marathi news crime mumbai why siddharth sanghvi was killed 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com