गुगल मॅपव्दारे एका क्लिकवर मिळणार आरोपींची कुंडली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झालीय.

या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगाराची कुंडली मिळणारय. यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, फोटो, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांकासह पत्ते गुगल मॅपव्दारे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या लिंकच्या माध्यमातून पोलिस गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.

येरवड्यातील यशस्वी प्रयोगानंतर स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तब्बल एक हजार गुन्हेगारांना गुगल मॅपवर आणून ठेवलंय.

त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिसांना गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवता येणार आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live