‘तितली’चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीला धडकले; कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी निर्माण झालेले ‘तितली’ हे तीव्र चक्रीवादळ आज (गुरुवार) आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 156 प्रती किमी वेगाने वारे वाहत आहेत.

बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी निर्माण झालेले ‘तितली’ हे तीव्र चक्रीवादळ आज (गुरुवार) आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 156 प्रती किमी वेगाने वारे वाहत आहेत.
पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, आंध्र प्रदेशला धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील ‘लुबन’ हे तीव्र चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. या दोन प्रणालींमुळे दोन्ही समुद्रांना उधाण आले असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ‘तितली’च्या प्रभावामुळे पूर्व किनारपट्टीसह महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार झाले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १२) कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘तितली’ चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केले आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास हे वादळ किनारपट्टीला धडकले. वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, विद्युत पुरवठा बंद झाला आहे. बुधवारी सकाळी ‘तितली’ ओडिशाच्या गोपाळपूरपासून ३२० किलोमीटर, तर आंध्र प्रदेशच्या कलिंगपट्टन्नमपासून २७० किलोमीटर अंतरावर समुद्रात होते. आज ते किनाऱ्याला धडकले. ओडिशा, आंध्रच्या किनाऱ्यासह पश्‍चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. किनाऱ्यालगतच्या सखल भागांमध्ये समुद्राच्या लाटांचे पाणी घुसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

राज्यातील दक्षता 
- शैक्षणिक संस्थांना दोन दिवस सुटी 
- 'इंडिगो'ची पाच विमाने रद्द 
- ओडिशा व आंध्र प्रदेशदरम्यानच रेल्वे सेवा स्थगित 
- राज्यातील विद्यार्थी संघटनाच्या निवडणुका रद्द 
- आपत्कालीन मदत पथके तयार 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live