दाभोळकर हत्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावलीय. आरोपीनं बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण कुठे घेतलं? तसंच या खुनाच्या अनुषंगानं अधिक चौकशीसाठी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. 

सीबीआयनं सचिन अंदुरेला काल दाभोलकरांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपीला आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीमध्ये सचिनचं नाव समोर आले होतं. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं सचिनला औरंगाबादमधून ताब्यात घेतलं. दरम्यान कुठलाही पुरावा नसताना आरोपीला अटक केली असल्याचं सचिनचे वकील प्रशांत सलसिंगीकर यांचं म्हणणं आहे.

तसंच सीबीआयनं अटक केलेल्या वीरेंद्र तावडेच्या चार्जशीटमध्ये नमुद केल्या प्रमाणे सचिनचं वर्णन नाही. त्या चार्जशीटमध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचा दाभोलकरांच्या खुनाशी संबंध असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सचिनला पुरावा नसताना अटक केल्याचं सलसिंगीकर यांनी म्हंटलं. दुसरीकडे  सीबीआयच्या वकिलांनी त्यांचा हा दावा खोडून काढलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live