दाभोलकर हत्या प्रकऱणी आणखी एक धक्कादायक खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

दाभोलकर हत्या प्रकऱणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जालन्याचे माजी नगरसेवक खुशालसिंह राणा ठाकूर यांच्या फार्महाऊसवर, अटक करण्यात आलेल्या श्रीकांत पांगारकरने पिस्तुल चालवण्याचा सराव केल्याची माहिती एटीएसच्या चौकशीत समोर आली आहे.

पांगारकरच्या कबुलीनंतर एटीएस पथकाने खुशालसिंह ठाकूर याच्या रेवगाव शिवारातील फार्म हाऊसची रविवारी झाडाझडची घेतली. जालना बायपासने अंबड रोडवरील रेवगावजवळ माजी नगरसेवक राणा ठाकूर यांची 22 एकर जमीन आहे.

या शेतात पाच खोल्यांचे फार्म हाऊस आहे. पाच रूमच्या फार्म हाऊसमध्ये मुक्काम करून श्रीकांत पांगारकरने बॉम्ब बनविले तसेच पिस्तूल चालविण्याचा सरावही केला. बॉम्ब बनविण्याचे साहित्य विहिरीत टाकल्याच्या संशयाने पोलिसांनी विहिरीची तपासणी केली.

याप्रकरणी एटीएसने खुशालसिंह राणासह त्याचा मुलगा सुबेरसिंहलादेखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

WebTitle : marathi news dabholkar murder case new twist in case investigation 

संबंधित बातम्या

Saam TV Live