दाभोलकर हत्या प्रकरण: औरंगाबादहून आणखी तिघांना अटक; हत्येसाठी वापरलं गेललं पिस्तूलही सापडलं

दाभोलकर हत्या प्रकरण: औरंगाबादहून आणखी तिघांना अटक; हत्येसाठी वापरलं गेललं पिस्तूलही सापडलं

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरे यांच्या चौकशीनंतर सीबीआय आणि एटीएसची रात्रभर कारवाई पार पडली. कारवाईअंती औरंगाबादमध्ये पहाटेच्या सुमारास तपास यंत्रणांनी आरोपी सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी छापा टाकला.

महत्वाचं म्हणजे या छाप्यात  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूलही पोलिसांनी जप्त केलं असून रोहित रेगे, नचिकेत इंगळे आणि अजिंक्य सुरले या तिघांना अटक केली आहे.  

सीबीआय आणि एटीएसने सचिन अंदुरेला अटक केली होती. नालासोपारा येथे स्फोटके सापडल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात  गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, 1 कुकरी, 1 एयर पिस्टल, 1 तलवार अशी हत्यारं सापडली आहेत. 

WebTitle : marathi news dabholkar murder case three more arrested from aurangabad  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com