दाभोलकर-पानसरे हत्या तपासाप्रकरणी हायकोर्टानं तपास यंत्रणांना; सुनावलं दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही हायकोर्टाच्या सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणी हायकोर्टानं तपासयंत्रणांना फटकारलंय. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असताना विशेष तपास पथक सतत माध्यमांसमोर का जात आहे. हे योग्य नाही, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडे बोल सुनावलंय. 

तपास यंत्रणांची कान उघाडणी करताना कोर्टाने दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही खडसावले आहे. या दोन्ही कुटुंबीयांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरफायदा घेवू नये, माध्यमांसमोर जावून या प्रकरणाचे पुरावे उघड करू नये, अशी समज त्यांना दिली. 

सीबीआयच्या अतिउत्साहीपणामुळे गुप्त माहिती प्रसार माध्यमांसमोर येत आहे, त्यामुळं आरोपी सतर्क होत आहेत असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय. दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरण संवेदनशील आहे. हायकोर्टानं फटकारल्यामुळं आता तरी या संवेदनशील प्रकरणातील गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांसमोर येणार नाही अशी आशा करुयात
 
संबंधित बातम्या

Saam TV Live