दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित म्हणून शिवसेनेचा माजी नगरसेवकही  एटीएसच्या ताब्यात

दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित म्हणून शिवसेनेचा माजी नगरसेवकही  एटीएसच्या ताब्यात

दाभोलकरांच्या हत्येप्रकरणात संशयित म्हणून शिवसेनेचा माजी नगरसेवकालाही जालन्यातून ताब्यात घेण्यात आलंय. श्रीकांत पांगारकर याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

पुणे आणि मुंबई येथील एटीएस पथकातील पोलीस सकाळपासून श्रीकांतच्या घरावर लक्ष ठेवून होते. पूर्ण खात्री पटल्यावर त्याला त्याच्या महसूल कॉलनीतील ‘राधेय’ या घरातून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. तो सेनेकडून दोनदा नगरसेवक होता.

कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्याची जालन्यात ओळख आहे. मध्यंतरी तो जालन्याऐवजी गोवा तसेच कोल्हापूर परिसरात वास्तव्यास होता. एटीएसचे पोलीस घरी आले तेव्हा कुटुंबीयांनी आमचा मुलगा असा गुन्हा करू शकत नाही, तुम्ही त्याला बळजबरीने अटक करत आहात, असा आरोप केला. काही महिन्यांपासून श्रीकांतवर पोलिसांची बारीक नजर होती.
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com