मुंबईतील सर्वात जुनं फुलमार्केट होणार बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जुलै 2018

फुल विक्रेत्यांमुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी 150 मीटर आवारात फुलं विकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. 

मुंबईतील सर्वात जुनं असलेल्या दादरच्या फुल मार्केटमधल्या फुल विक्रेत्यांच्या व्यवसायावर लवकरच गदा येणार आहे. दादर स्टेशनच्या 150 मीटर आवारात फुलांची विक्री करण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने आता बंदी घातली आहे.

फुल विक्रेत्यांमुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी 150 मीटर आवारात फुलं विकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. 

दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशामुळे दादर स्थानकाजवळील फुल विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत फुल विक्रेत्यांकडून पर्यायी जागेची मागणी करण्यात येत आहे.   
 
WebTitle - marathi news dadar phool market to shut 

संबंधित बातम्या

Saam TV Live