148 व्या जयंती निमित्त दादासाहेब फाळके यांना गुगलचे डूडल समर्पित

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

गुगलने सुप्रसिद्ध दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांच्या आज 148 व्या जयंती निमित्त डूडल समर्पित केले आहे. 'भारतीय सिनेमाचा पिता' म्हणून दादासाहेब फाळके यांची ओळख आहे. एक लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक अशा विविधअंगी भूमिका बजावून त्यांनी आपल्या 19 वर्षातील कार्यकाळात 95 चित्रपट आणि 27 लघुपटांची निर्मिती केली.

त्यांचे पुर्ण नाव धुंडीराज गोविंद फाळके. 3 मे 1913 ला त्यांनी पहिला फिचर सिनेमा रिलिज केला. तो म्हणजे 'राजा हरिशचंद्र'. हा सिनेमा भारतातील पहिला पूर्ण वेळेचा सिनेमा आहे. त्यानंतर त्यांनी 'मोहिनी भस्मासुर', 'सत्यवान सावित्री' आणि 'कलिया-मर्दन' यासारख्या यादगार सिनेमांची निर्मिती केली. 

दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 ला महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे झाला. त्यांचे वडील एक कुशल विद्वान होते. दादासाहेब फाळके यांनी 1895 मध्ये मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी वडोदरीतील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या बडोदा येथील कला भवनमधून शिल्पकला, अभियांत्रिकी, रेखाचित्र, चित्रकला आणि फोटोग्राफीचा अभ्यासक्रम केला.

फाळके यांचे व्यावसायिक भागीदारांसह झालेले मतभेद आणि मूकसिनेमा 'द लाइफ ऑफ क्राइस्ट' बघितल्यानंतर ते सिनेमा क्षेत्राकडे वळले. 1969 साली भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना करुन या भारतीय सिनेमाच्या पित्याला सन्मानित केले. दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय सिनेमातील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्काराने सर्वप्रथम अभिनेत्री देविका राणी यांना गौरविण्यात आले होते. राज कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले, यश चोप्रा, सत्यजित राय, मृणाल सेन, श्याम बेनेगल यांनाही दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिवंगत  अभिनेते विनोद खन्ना यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला गेला आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live