दहीहंडीला स्पर्धेची मान्यता; शिवसेना आमदार करणार पहिल्यावहिल्या दहीहंडी स्पर्धेचं आयोजन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

एरव्ही गोपाळकाल्यानिमित्त ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मात्र, या दहीहंडीला आता वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी सरकारने पावलं उचलली असून. दहीहंडीला क्रीडा खात्याकडून स्पर्धेची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दहिहंडी उत्सवाला नवं ग्लॅमर मिळणार असल्याने बाळगोपाळांचा उत्साह निश्चितच द्विगुणित झाला आहे. 

कमी कमी वेळेत थर रचणा-या पथक विजयी ठरणार असून, एकूण 10 पथकांमध्ये दहीहंडीचा थरारक खेळ रंगणार आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठान तर्फे पहिल्यावहिल्या दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून. स्वत: क्रीडा मंत्री विनोड तावडे दहिहंडी स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live