महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी, जसलोक रुग्णलयातील धक्कादायक प्रकारामुळे सर्वच अवाक!

वैदेही काणेकर
बुधवार, 1 एप्रिल 2020

आता महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी... जसलोक हॉस्पिटलच्या एका नर्सने केलेल्या गौप्यस्फोटानं महाराष्ट्राची झोप उडालीय... पाहा काय खळबळजनक आरोप केलेत एका नर्सने... 

कोरोनानं भारतासह साऱ्या जगालाच वेठीस धरलेलं असताना विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडलाय. कारण जसलोक रुग्णालयात घडलेली घटना जितकी धक्कादायक आहे, तितकीच चिंताजनकही आहे. जसलोक हॉस्पिटलमधल्या एका नर्सने साम टीव्हीकडे धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. ज्यात त्या नर्सने जसलोक रुग्णालयावर गंभीर आरोप केलेत. काय म्हणालीय नर्स ते तुम्हीच ऐका. 

 

नर्सच्या या गंभीर आरोपानंतर साम टीव्हीनं ईमेलद्वारे जसलोक प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही. 
संबंधित नर्सने केलेले आरोप खरे असतील तर हा हलगर्जीपणा अत्यंत गंभीर आहे. ज्या आरोग्य सेवकांवर रूग्णांचा जीव वाचवण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या जिवशीच खेळ सुरूंय. त्यामुळे आता राज्याच्या आरोग्यखात्यानंच यात गांभीर्यानं लक्ष घालण्याची गरज आहे..कारण सवाल तुमच्या आमच्या जिवाचं रक्षण करणाऱ्या आरोग्य सेवकांचा आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live