मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आईवडिलांचा काटा काढला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

नागपूर - प्रेमास विरोध करीत असल्यामुळे मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आईवडिलांचा काटा काढला. गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी दत्तवाडी येथे घडलेल्या हत्याकांडाचा पर्दाफाश करीत मृतांची मुलगी व तिच्या प्रियकराला अटक केली. ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका चंपाती (वय २३) व तिचा प्रियकर इखलाख खान (वय २३, रा. वडधामना) अशी अटकेतील आरोपींची नोव आहेत. शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) व सीमा शंकर चंपाती (वय ६४, दोन्ही रा. दत्तवाडी) अशी मृतांची नावे आहेत. ऐश्वर्या ही आयटी इंजिनिअर असून ती आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करते. खान हा क्रिकेटर आहे. त्याने अंडर १६ व अंडर १९ स्पर्धा खेळली आहे.

शंकर हे वेकोलिचे निवृत्त अधिकारी होते. आठ महिन्यांची असताना ऐश्वर्याच्या आई-वडिलांचे अपघातात निधन झाले. त्यामुळे चंपाती दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. ऐश्वर्या आठवीत असताना तिचे इखलाख याच्यासोबत प्रेमसंबंध होते. चार महिन्यांपूर्वी याची कुणकूण शंकर यांना लागली होती. त्यामुळे त्यांनी दत्तवाडीतील घर विकण्याची तयारी चालविली होती. दीड कोटी रुपयांमध्ये घर विकून पुण्याला स्थायिक होण्याची शंकर यांची योजना होती. वडील प्रेमात अडसर ठरत असून ते घर विकण्याच्या तयारीत असल्याचे ऐश्वर्याने इखलाख याला सांगितले. त्यामुळे इखलाख संतापला. त्याने ऐश्वर्याच्या मदतीने शंकर व सीमाचा काटा काढण्याची योजना आखली. 

कटानुसार रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ऐश्वर्या ब्यूटीपार्लरमध्ये जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास तोंडाला दुपट्टा लावून इखलाख घरात घुसला. बैठक खोलीत शंकर तर बेडरूममध्ये सीमा या झोपल्या होत्या. सत्तूरने इखलाख याने शंकर यांच्या गळ्यावर व डोक्‍यावर सपासप वार केले. शंकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने सीमा यांच्यावर सत्तूरने वार करून सीमा यांची निर्घृण हत्या केली व पसार झाला. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ऐश्वर्या घरी आली. 

घरातील साहित्य अस्ताव्यस्त होते. शंकर व सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ऐश्वर्याने आरडाओरड केली. भाडेकरू व शेजारी जमले. शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

तपासादरम्यान पोलिसांना ऐश्वर्यावर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. प्रेमात अडसर ठरत असल्याने इखलाख याने हत्या केल्याचे तिने मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी इखलाख यालाही अटक केली. 

खरबुजातून दिले गुंगीचे औषध
रविवारी कंपनीला सुटी असल्याने प्रियंका घरी होती. योजनेनुसार दुपारच्या सुमारास तिने आईवडिलांना खरबूज खायला दिले होते. त्यात गुंगीचे औषध मिसळले. आईवडील बेशुद्ध झाले. त्यानंतर प्रियकराला बोलावून घेतले व नारळ कापण्याच्या कोयत्याने त्यांना संपवले. त्यानंतर ती सीताबर्डी परिसरातील बिग बाजारमध्ये फिरायला गेली. तर प्रियकर दुसरीकडे निघून गेला.

Web Title: Marathi news daughter killed parents with the help of her boyfriend 

संबंधित बातम्या

Saam TV Live