मुलींनीच केला आईसह तिघांचा खून

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

सोलापूर : तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरातील तिहेरी खून प्रकरणात धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली. कौटुंबिक त्रासाला कंटाळून धुना आणि वसन या बहिणींनीच आई, भाऊ आणि बहिणीचा खून केल्याची कबुली दिली आहे. 

मूळचे गुजरातचे असलेले रणसोड जाधव आणि त्यांचे कुटुंबीय तिऱ्हे येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरात झोपडी करून राहायला होते. घरगुती कामाच्या कारणावरून आई हयातबाई, बहीण लाखी व भाऊ मफा हे तिघे धुना आणि वसन यांना सतत मारहाण करत होते. त्रासाला कंटाळेल्या बहिणींनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लोखंडी गजाने मारून आईसह तिघांना संपविले. खुनाच्या घटनेनंतर दोघीही पळून बसमधून गुजरातच्या दिशेने निघाल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघींचा शोध घेतला.

संबंधित बातम्या

Saam TV Live