मृत अश्‍विनी बिद्रेंच्या बदलीचा काढला शासनाने आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

कोल्हापूर - मृत सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला असताना गृह विभागाने त्यांच्या बदलीचा आदेश काढल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बिद्रे २०१६ मध्ये बेपत्ता झाल्याची नोंद असून, ३१ मे २०१७ ला बदलीचा आदेश आहे. त्यामुळे याची चौकशी करावी, अशी मागणी बिद्रे यांचे पती राजकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बिद्रे यांचे अपहरण व त्यानंतर खून प्रकरण राज्यात गाजत आहे. त्या २०१६ मध्ये बेपत्ता असून, त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. असे असताना गृह विभागाने त्यांच्या बदलीचा आदेश ३१ मे २०१७ ला दिला आहे. हा आदेश म्हणजे संशयित आरोपींना मदत करण्यासाठीचा प्रकार आहे.

निवेदनात म्हटले आहे, की ३१ जानेवारी २०१७ ला अभय कुरुंदकरसह चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, ३१ मे २०१७ ला बिद्रे यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. त्या मृत झाल्याचे माहीत असताना त्यांच्या बदलीचा आदेश कशासाठी दिला व त्यातून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे?

WebTitle : marathi news dead ashwini bidre transfer order 

संबंधित बातम्या

Saam TV Live