गोंदियात मसूर डाळीत मृत वटवाघुळाचे पिल्लू; निकृष्ट आहार देण्यापेक्षा काहीच देऊ नका ?

संजय डाफ
शुक्रवार, 19 जुलै 2019

प्रतापनगर प्राथमिक शाळेत पोषण आहार म्हणून देण्यात येणाऱ्या भातामध्ये चक्क अळ्या आढळल्यात. या घटनेमुळं चांगलीच खळबळ उडालीय. हा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशीच खेळ आहे. दुपारच्या सुमाराला आहार वाटप करत असताना शिक्षकांना भात कच्चा आढळला. त्यानंतर भाताची अधिक पाहणी केल्यावर त्यात मोठ्या प्रमाणात अळ्या आढळल्यानं शिक्षकांनी मुलांना आहार वाटप थांबवलं.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत पाहणी केली. ज्या सौरभ महिला विकास मंचाला शालेय पोषण आहाराची जबाबदारी देण्यात आलीय त्यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनी थातुरमातुर आणि उद्धट उत्तरं दिली.

दुसरीकडे गोंदियात आंगणवाड़ीतून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मसूर डाळीच्या सीलबंद पाकिटात मृत वटवाघुळाच्या पिल्लू निघालंय. मायरा वाघमारे या मुलीला आंगणवाडीतून हे मसूर डाळीचं पाकीट दिलं होतं. पोषण आहार निकृष्ट दर्जाचा देणार असाल तर देऊच नका असा सूर उमटतोय.

WebTitle : marathi news dead bat found in masur dal given by anganvadi 

संबंधित बातम्या

Saam TV Live