अटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल झालं. दरम्यान, वाजपेयी यांच्या समर्थकांची मोठी गर्दी रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळाली. वाजपेयी यांच्या समर्थकांकडून 'वाजपेयीजी अमर रहे' या घोषणा दिल्या जात होत्या.

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 93 वर्षी निवर्तले. गुरुवार 16 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, वाजपेयी यांनी राजकारणात आपले अढळपद निर्माण केले, कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य केले. तितक्‍याच सहजतेने त्यांनी साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी केली. आपल्या साहित्यिक कारकिर्दीची मोहर उमटवली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live