मुंबईच्या किनारपट्टीवर घातक क्षेपणास्त्रं तैनात; क्षेपणास्त्रांचं मुंबईला कवच !

नागपूरहून संजय डाफसह वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई.
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुंबईच्या किनारपट्टीवर घातक क्षेपणास्त्रं तैनात
रडारशी संलग्न असलेल्या क्षेपणास्त्रांचं मुंबईला कवच 
खोल समुद्रातील हालचाली टिपण्यासाठी उभारणार यंत्रणा

मुंबईसह देशभरातल्या किनारपट्टीद्वारे होत असलेली घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. किनारपट्टीवर आता थेट ब्राम्होस क्षेपणास्त्र तैनात केली जाणार आहेत. त्या संबंधीच्या खरेदीला अलीकडेच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

२६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईसह देशभरातल्या किनारपट्टींवर २० ठिकाणी AIS यंत्रणा बसवण्यात आली. या यंत्रणेच्या आधारे येणारी प्रत्येक बोट किंवा समुद्रातील प्रत्येक हालचाल टीपता येते. या यंत्रणेलाच आता रडारचीही जोड देण्यात येणार आहे. देशभरातल्या किनारपट्ट्यांवर एकूण ५७ रडार बसविण्याचा निर्णय झाला असून त्यापैकी ४१ रडार बसविण्यात आले आहेत. त्यापैकी चार रडार मुंबई शहर व उपनगराच्या किनारपट्टीवर बसवण्यात आली असून १७० किमी अंतरापर्यंतच्या आकाशातील अथवा समुद्री पृष्ठभागावरील हालचाली हे रडार टिपू शकते. याच रडारला आता 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्र संलग्न असतील. 

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संरक्षण खरेदी परिषदेची बैठक अलीकडेच पार पडली. या बैठकीत सर्व किनारपट्ट्यांवर ही क्षेपणास्त्र प्रणाली बसविण्यास मंजुरी देण्यात आलीय. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर किनारपट्टीवर बसविण्यात आलेल्या रडारने शत्रूचं एखादं जहाज टिपल्यास त्या जहाजावर तात्काळ 'ब्रह्मोस' हे आवाजाच्या वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र डागण्यात येणार आहे. 

'नेक्स्ट जनरेशन मेरिटाइम मोबाइल कोस्टल बॅटरीज' असं नाव असलेला हा जवळपास १३५० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईची सागरी सुरक्षा अधिक चोख राखली जाणार आहे.

WebTitle : marathi news deadly missiles installed on the coastal area of mumbai  


संबंधित बातम्या

Saam TV Live