मटणावर ताव मारताना थोडं सांभाळून; मटणातलं हाडूक घशात अडकल्यानं एकाचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मांसाहारी लोकांमध्ये मटण खाणाऱ्यांचा एक वेगळाच वर्ग आहे. शिवाय मांसाहारीमध्ये मटणाला प्राधान्य देणाऱ्यांचा वेगळा आब-रूबाब आहे. मटण आणि त्यातही हड्डीवालं मटण खातो असं अनेकजण मोठ्या अभिमानानं सांगतात.

पण हीच हड्डी खाणं अमरावतीतल्या एका व्यक्तिच्या जीवावर बेतलंय. अमरावतीच्या विनोद वाघमारे यांचा मटणाची हड्डी श्वासनलिकेत अडकून मृत्यू झालाय. विनोद यांच्या घरी मटणाचा बेत केला होता. मटणातली हड्डी चोखताना ती त्यांच्या गळ्यात अडकली. हॉस्पिटलला नेईपर्यंत त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता.

विनोद वाघमारे यांच्याबाबत झालेला प्रकार हा अत्यंत धक्कादायक असला तरी तो दुर्मिळ म्हणावा लागेल. त्यामुळं जेवणात हड्डी असली तर त्यावर तुटून पडू नका, थोडं बेतानंच खा असं म्हणणं संयुक्तिक ठरेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live