मोदींना जीवे मारण्याची धमकी; कुठे सापडलाय धमकीचा संदेश ?

मोदींना जीवे मारण्याची धमकी; कुठे सापडलाय धमकीचा संदेश ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली गेलीय. तिही 500 रूपयांच्या नोटेवर. केरळच्या गुरुवायूर मंदिरात पंतप्रधान मोदी पुजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मंदिराच्या कार्यालयाला एक लिफाफा पाठवण्यात आला होता. या लिफाफ्यात 500 रुपयांची नोट होती. या नोटेवर मल्ल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

7 जूनला हे पत्र मंदिराच्या कार्यालयाला पाठवण्यात आलं होतं. त्यावर इंग्रजी भाषेत काही शब्द होते, मात्र ते काही कोड असतील अशी शक्यता वर्तवली जातेय. हे पत्र मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. गुप्तचर यंत्रणेने या पत्राला गांभीर्याने घेतलं असून हे पत्र कोणी लिहिलं याची कसून चौकशी करण्यात येतेय.

दरम्यान, दोन जून रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे दिली होती. राजस्थानमधील भाजप अध्यक्ष मदन लाल सैनी यांना एक पत्र लिहून अज्ञात व्यक्तीने मोदींना मारण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण त्यावेळी तात्काळ पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चार संशयीत आरोपीची चौकशी केली होती. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 

मोदींच्या शपथविधी समारंभाआधी भाजपच्या प्रदेश मुख्यालयाला एक पत्र आले होते. त्यामध्ये मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने हे निनावी पत्र आले होते. त्यावर भाजपच्या मुख्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. चिठ्ठीत लिहिले होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात त्यांच्या छातीत गोळ्या झाडण्यात येणार आहेत. ही चिठ्ठी पाठवणाऱ्याने आपले नावही दिले होते. त्या चिठ्ठीवर पाठवणाऱ्याचा पत्ताही देण्यात आला होता. या धमकीपत्रात राकेश टांक, भैय्या पारीक, आणखी एकाचा उल्लेख होता. या चिठ्ठीवर देण्यात आलेला पत्ता हा जयपूरचा होता. चिठ्ठीमध्ये जयपूरमधल्या आमेर रोडवरच्या कच्चा बंधा, गणेश कॉलनीतील शिवाड भागाचा पत्ता देण्यात आला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी चिठ्ठी मिळाल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या हवाली केली होती असे सांगितले होते. 

WebTitle : marathi news death threat to PM Narendra Modi message found on the 500 note

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com