वेस्ट इंडिज सोबतच्या पहिल्याच सामन्यात पृथ्वीने ठोकलं खणखणीत शतक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

राजकोट : कसोटी पदार्पणात मुंबईकर 'पृथ्वी शॉ'ची धडाकेबाज एन्ट्री केलीये. कर्णधार विराट कोहली आणि भारतीय निवड समितीच्या भरवश्यावर खरं उतरत पृथ्वी शॉ याने वेस्ट इंडिज सोबतच्या पहिल्याच सामन्यात  खणखणीत शतक ठोकलंय. फक्त 99 चेंडूत शतक ठोकत ही वाखाणण्याजोगी कामगिरी केलीये.   केएल राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारासोबत भागीदारी करत  पृथ्वी शॉ याने हे शानदार शतक ठोकलंय.   

ज्युनियर वर्ल्डकप ते कसोटी 
याच वर्षात भारताने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक जिंकला होता. तेव्हापासून पृथ्वीच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. रणजी क्रिकेट, प्रथम श्रेणी अ संघांतून मिळालेल्या संधीचे सोने करून पृथ्वीने सर्वांचे लक्ष वेधले होते. इंग्लंड दौऱ्यात शिखर धवन आणि मुरली विजय अपयशी ठरल्यामुळे त्याचा कसोटी संघातील मार्ग मोकळा झाला. इंग्लंड दौऱ्यात त्याचा समावेश करण्यात आला होता; परंतु अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 

दुसरा सर्वांत लहान सलामीवीर 
उद्या पृथ्वी शॉ मैदानात येईल, तेव्हा तो देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान (18 वर्षे 329 दिवस) सलामीवीर ठरेल. सर्वांत लहान सलामीवीर म्हणून विजय मेहरा (17 वर्षे 265 दिवस) यांचा विक्रम आहे. 1955 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियवर त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. 

प्रगतीचा आलेख
मुंबईतील शालेय क्रिकेटमध्ये धावांचा विक्रमी पाऊस पाडणारा पृथ्वी शॉ आत्तापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामन्यात खेळला आहे. यामध्ये 56.72 च्या सरासरीने त्याने सात शतके आणि पाच अर्धशतके झळकावलेली आहेत. 2016 मध्ये रणजी पदार्पणातही त्याने शतक केले होते. वर्षानंतर दुलीप करंडक स्पर्धेतही पदार्पणात शतकी खेळी साकार केली होती. 

WebTitle : marathi news debutant prithvi shaw scored half century against west indies at rajkot test 

संबंधित बातम्या

Saam TV Live