हेल्मेटसक्‍तीचा निर्णय रद्द करण्यात येणार नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

मुंबई - हेल्मेटसक्‍तीचा निर्णय रद्द करण्यात येणार नाही. मात्र, पोलिसांनी गटाने थांबून वाहनधारकांना अडविणे, त्यांना चालान देणे, हे प्रकार बंद केले जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

पुण्यातील गल्ली-बोळांत, चौकांत पोलिस गटाने उभे असतात. ते वाहनचालकांना थांबवीत सक्‍तीने दंडवसुली करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुण्यातील आमदारांनी ही कैफियत मांडली. आतापर्यंत सक्‍तीने ५० कोटी रुपयांचा दंड वसूल झाल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. नागपूर तसेच मुंबईप्रमाणे पुण्यात सीसीटीव्हीवर पाहून हेल्मेट घातले नसेल, तर संबंधित चालकाला घरी किंवा कार्यालयात चालान पाठविले जाईल. रस्त्यावर अडवून कारवाई होणार नाही, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले.

Web Title: Helmet Compulsory Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Saam TV Live