विठ्ठल मंदिरात मनमोहक सजावट

विठ्ठल मंदिरात मनमोहक सजावट

पंढरपूर (सोलापूर) : माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त आज आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सजावट करण्यात आली. मनमोहक सजावट, पांढराशुभ्र पोशाख डोक्यावर पगडी यामुळे राजस सुकुमार अर्थात सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसू लागले. यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाखाहून अधिक भाविक पंढरीत आले आहेत.
जरबेरा, अष्टर, मोगरा, झेंडू अशा विविध रंगीबेरंगी फुलांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात पुण्याच्या मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. माघी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल कथा सुनील जोशी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. श्री रुक्मिणी मातेची पुजा लेखापरीक्षक सुरेश कदम यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख आणि आकर्षक पगडी घालण्यात आली असून रुक्मिणी मातेला देखील आकर्षक पोषाख करण्यात आला आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सर्व सहा पत्राशेड भरून गोपाळपूर रस्त्यावर गेली आहे.


माघ एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत स्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी पहाटेपासून चंद्रभागेच्या तीरावर गर्दी केली होती. नदीमध्ये पुरेसे पाणी असल्यामुळे भाविकांच्या स्नानाची चांगली सोय झाली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वत्र फिरून लक्ष ठेवत आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग आणि चंद्रभागेचा वाळवंट हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. श्रीविठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच यात्रा आहे. अनेक भाविकांना याची कल्पना नसल्यामुळे रांगेत उभारलेल्या भाविकांना मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

Web Title decoration vitthal temple pandharpur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com