जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी अखेर दीपक मानकर अखेर पोलिसांसमोर हजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर अखेर पुणे पोलिसांना शरण आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताना दहा दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेशही मानकरांना दिले होते.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, दीपक मानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र जगताप हे अनेक वर्ष दीपक मानकर यांच्याकडे काम करत होते. त्यांनी 2 जून रोजी आत्महत्या केली होती.

जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दीपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं. या पाच जणांत दीपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

WebLink : marathi news deepak mankar surrenders in jitendra jagtap suicide case   

संबंधित बातम्या

Saam TV Live