दीपिकाचंही ड्रग्ज कनेक्शन समोर, वाचा ड्रग्ज माफियांसोबत दीपिकाचं चॅट?

साम टीव्ही
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

 

  • दीपिका विचारते माल है क्या ?
  • ड्रग्ज माफियांसोबत दीपिकाचं चॅट ?
  • ड्रग्जच्या जाळ्यात अडकलीय का दीपिका ?

ड्रग्जप्रकरणी NCBनं लावलेल्या सापळ्यात बॉलिवूडमधल्या दिग्गज हिरॉईन्स सापडल्यायेत. आता यात आणखी एक नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोणचं. ड्रग्ज माफियासोबत दीपिकानं केलेलं चॅट आता समोर आलंय. त्यामुळे बॉलिवूडची मस्तानी अडचणीत सापडलीय. 

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोण आतापर्यंत आपल्या अभिनयानं लाईमलाईटमध्ये होती. पण आता ड्रग्ज माफियांसोबत संबंध असल्याच्या कारणावरून दीपिका चर्चेत आलीय. 

सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या एका कथित चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे. NCBच्या सूत्रांनुसार, Dचा अर्थ दीपिका पदुकोण आणि Kचा अर्थ करिश्मा, असा सांगण्यात येत आहे. करिश्मा ही जया साहाची सहकारी आहे. या दोघींमधलं एक चॅटही समोर आलंय. त्यात दीपिका करिश्माला विचारते...

दीपिका : आपल्याकडे माल आहे का?
करिश्मा : आहे पण घरी आहे. मी वांद्र्यात आहे.
करिश्मा : जर तुम्हाला हवा असेल तर अमितला सांगते.
दीपिका : हो. प्लीज
करिश्मा : अमितकडे आहे, तो ठेवतो.
दीपिका : Hash ना?
दीपिका : गांजा नाही
करिश्मा : कोकोकडे तू केव्हा येते आहे.
दीपिका : साडे 11 ते 12 च्या दरम्यान

हेच ते चॅट ज्यामुळे दीपिकासमोरच्या अडचणी वाढल्यायेत. यातून दीपिकाचे ड्रग्ज माफियांसोबत संबंध असल्याच्या चर्चांना ऊत आलाय. 

याआधी ड्रग्जप्रकरणी सारा अली खान, रकुल प्रीत आणि श्रद्धा कपूर यांची नावं समोर आली आहेत. त्यात आता दीपिकाचं नाव जोडलं गेलंय. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आपल्या दिलखुलास अभिनयामुळे बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचं नाव घेतलं जातं. दीपिकानं एकापेक्षा एक हिट सिनेमे देऊन बॉलिवूडमध्ये स्वत:ची छाप सोडलीय. पण आता या नशेडी गँगमध्ये तिचंही नाव आलंय. तपासाअंती काय खरं ? काय खोटं हे समोर येईलच..पण सुशांतसिंह मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवूडचा बेगडी मुखवटा गळून पडलाय हेही अगदी खरं
 


संबंधित बातम्या

Saam TV Live