काँग्रेसला पराभव जिव्हारी; राहुल गांधी देणार अध्यक्षपदाचा राजीनामा?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला चांगलीच टक्कर देईल अशी चर्चा होती. त्यासाठी राहुल गांधींनी मोर्चेबांधणी देखील केली. मात्र त्यांच्या पदरी अपयशच आलं. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन आपला पराभव मान्य केलाय. मात्र त्याचबरोबर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी देखील केलीय. राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देतील अशी खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. यासंदर्भात काँग्रेस कार्यकरिणीच चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाणारंय. 

दीड वर्षांपूर्वी राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतली. राहुल गाँधी काहीतरी करिष्मा करतील असं वाटत होतं. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकचा अपवाद वगळता राहुल गांधी फारशी प्रभावी कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास काँग्रेसची धुरा कुणाच्या खांद्यावर सोपवणार हाही महत्वाचा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live