अजित पवारांना मोठा फटका, जयंत पाटील होणार उपमुख्यमंत्री

Ajit Pawar not taking oath today and Jayant Patil may be new DY CM
Ajit Pawar not taking oath today and Jayant Patil may be new DY CM

मुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतल्यानंतर त्यांना आज होणाऱ्या शपथविधीवेळी शपथ देण्यात येणार नाही. तर, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबरनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यात आल्याने त्या पदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, अजित पवार यांना हे पद देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. परंतु, पक्षाविरुद्ध बंड केल्याने त्यांच्याविरुद्ध काहीसा नाराजीचा सूरही आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले मत जयंत पाटील यांच्या पारड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. 

महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मंत्रिपदांच्या वाटपाचेही सूत्र ठरले असून, त्यानुसार उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय, देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलाविण्यात आले आहे. 

शपथविधी समारंभापूर्वी बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. तीत प्रामुख्याने मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

Web Title: NCP leader Ajit Pawar not taking oath today and Jayant Patil may be new DY CM

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com