दहशतवाद न थांबवल्यास पाकिस्तानचे तुकडे अटळ - राजनाथ सिंह 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 सप्टेंबर 2019

भारतानं जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे...खोटे आरोप करत काश्मीरचा मुद्दा जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र कोणीच साथ न दिल्यामुळं हा प्रयत्न हाणून पडलाय. काश्मीरबाबत खोटे आरोप करणाऱ्या पाकिस्तानला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सणसणीत चपराक लगावलीय.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मानवी हक्क पायदळी तुडवण्याच्या घटनांमध्ये वाढ होतेय. इतरांनी कुणी पाकिस्तानचे तुकडे करण्याची गरज नाही. दहशतवादाला पाठीशी घालणे थांबवले नाही, तर पाकचे आपोआप तुकडे होतील असा इशाराच राजनाथ सिंहांनी दिलाय.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पीओकेमधील मुझफ्फराबादमध्ये बोलताना, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषेकडे कूच करु नये असं वक्तव्य केलं होतं. यालाही राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय. सीमेपलिकडून पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. भारतानं पाकिस्तानच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलंय. आता भारतानं घेतलेल्या कडक पवित्र्यामुळं पाकिस्तानचे धाबे दणाणलेत.

Webtitle : marathi news defence minister rajnath singh to pakistan 

संबंधित बातम्या

Saam TV Live