विठूनामाच्या गजराने देहू नगरी दुमदुमली 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 जुलै 2018

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा, दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल होत असून, त्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी स्वागत कमानी उभारल्या असून, ठिकठिकाणी अन्नदानासाठी मंडपही उभारले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान दुपारी दोन वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून होईल. देऊळवाड्यातील भजनी मंडपात तुकोबांच्या पादुकांची पूजा होईल. त्यानंतर देऊळवाड्यात पालखी प्रदक्षिणा होऊन पालखी इनामदारवाड्यात मुक्कामी पोहोचेल.

संबंधित बातम्या

Saam TV Live