भाजप आणि काँग्रेसमध्ये मिशन शक्तीच्या यशाचे श्रेय घेण्यावरून स्पर्धा

भाजप आणि काँग्रेसमध्ये मिशन शक्तीच्या यशाचे श्रेय घेण्यावरून स्पर्धा

नवी दिल्ली: भाजप आणि काँग्रेसमध्ये मिशन शक्तीच्या यशाचे श्रेय घेण्यावरून स्पर्धा लागली आहे. काँग्रसेने या अभियानाची सुरूवात यूपीए सरकारच्या काळात झाली होती असे सांगत तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे अभिनंदन केले. तर दुसरीकडे काँग्रेसचा हा दावा खोडत यूपीए सरकारने डीआरडीओला हे अभियान पुढे सुरू ठेवण्यास परवानगी दिली नव्हती, असे म्हटले.

परंतु, या यशावरून सोशल मिडियावरही चर्चा चालू आहे या यशाचे श्रेय यूपीए सरकारला जाते असे म्हटले जात आहे. यूपीए सरकारच्या काळात अँटी सॅटेलाईट मिशनची सुरूवात झाली. आज हे अभियान पूर्ण झाले. 2012 मध्ये डीआरडीओचे प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी अँटी सॅटेलाइट मिसाईल कार्यक्रम पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, असेही सांगण्यात येत आहे, काँग्रेस नेत्यांनीही असाच दावा केला आहे.

भाजपकडून मात्र हा दावा खोडून काढण्यात आला असून, 2012 मध्ये डीआरडीओचे प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी अँटी सॅटेलाइट मिसाईल कार्यक्रम पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केली. पण तत्कालीन सरकारने त्याला परवानगी दिली नाही असा दावा करण्यात आला आहे. यानंतर, 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अभियानाला पुढे देण्यास सहमती दर्शवली. या यशानंतर भारत अवकाशात शक्तिशाली बनला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Mission Shakti Congress Bjp Claims Over Success

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com