एअर स्ट्राइकचे पुरावे हवाई दलाने केंद्र सरकारकडे सोपवले

एअर स्ट्राइकचे पुरावे हवाई दलाने केंद्र सरकारकडे सोपवले

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी ला पाकिस्तानातील बालकोटमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताकडून मिळालेल्या चोख प्रत्युत्तरानंतर जगाने भारताच्या या उत्तराला पाठींबा दर्शविला. पण या एअर स्ट्राईकवर प्रश्नही उभे केले गेले. मात्र आता भारतीय हवाई दलाने यावर उत्तर म्हणून एअर स्ट्राईक झाल्याचा अहवालच केंद्र सरकारकडे सादर केला आहे. 

हा अहवाल म्हणजे एअर स्ट्राइकचे पुरावे हवाई दलाने केंद्र सरकारकडे सोपवले आहेत. 'या स्ट्राईकसाठी जे बॉम्ब वापरले त्यातील 80 टक्के बॉम्बने अचूक लक्ष्यावर प्रहार केला', असे हवाई दलाने आपल्या अहवालात म्हटले आहे. एअर स्ट्राइकच्या यशस्वीतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यापुर्वीही सर्जिकल स्ट्राईक या पार्श्वभूमीवर हवाई दलाने सरकारकडे सोपवलेले पुरावे महत्वपूर्ण आहेत. 

या एअर स्ट्राईकमध्ये झाडे आणि जंगलाचा भाग वगळता फार काही नुकसान झाले नाही असा पाकिस्तानचा दावा आहे. जर नुकसान झाले नाही मग पाकिस्तानी फायटर विमानांनी भारतीय हद्दीत घुसून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न का केला ? असा सवाल हवाई दल प्रमुखांनी विचारला होता.

'हवाई दलाने एअर स्ट्राइकसंबंधी तयार केलेल्या 12 पानी अहवालात उपग्रहाच्या मदतीने घेण्यात आलेले हाय रेसोल्युशन फोटो आणि एसएआर रडारच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंचा समावेश आहे. ते फोटो केंद्र सरकारकडे सुपूर्द केले आहेत,' असे हवाई दलातील सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले.
Web Title: Air strikes proofs were handed over to the Central Government by indian air force

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com