एकाच घरात लटकलेल्या अवस्थेत 11 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 जुलै 2018

उत्तर दिल्लीतल्या बुरारी भागात एका घरात लटकलेल्या अवस्थेत 11 मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन कुटुंबातील 11 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्यापही या 11 जणांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे.

11 पैकी 10 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते, तसंच त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. तर, एक मृतदेह जमिनीवर पडलेला होता.

मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही दोन भावांच्या कुटुंबातील असून, मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील एक जण प्लायवुडचा धंदा करत होता, तर दुस-याचं किराणा मालाचं दुकान होतं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live