दिल्लीत पोलिसाच्या मुलानं एका तरूणीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

सत्ता आणि ताकदीचा वरदहस्त असला की माणूस सैतान होतो. त्यातलाच हा पाहा सैतान. 

हा आहे दिल्लीचा रोहित तोमर. रोहितनं एका तरूणीला अमानुष मारहाण केलीय. ज्या तरूणीला मारहाण झाली ती दुसरी तिसरी कोणी नसून ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात येतंय. रोहित तोमरच्या दोन गर्लफ्रेंड आहेत. त्यातल्या एकीशी त्याचं जमलेलं लग्न मोडलं. त्यामुळं संतापलेल्या रोहितनं दुसऱ्या गर्लफ्रेंडला अमानुष मारहाण केली.

अशी मारहाण कोणी जनावरालाही करत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होतोय.

ज्या तरूणीशी रोहितचं लग्न जमलं होतं तिनं मारहाणीचा व्हिड़ीओ पाहिला. तिनं रोहितविरोधात पोलिसांत तक्रार केली. शिवाय केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही या प्रकरणाची दखल घेतली. दिल्ली पोलिसांनी तातडीनं कारवाई करत रोहितला गजाआड केलंय. रोहितसारखी सैतानी वृत्ती ठेचून काढण्याची मागणी होतेय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live