दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पावडरचा हल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पावडर फेकून हल्ला केल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी घडला. मिरची पावडर फेकणाऱयास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव आहे.

नवी दिल्ली :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पावडर फेकून हल्ला केल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी घडला. मिरची पावडर फेकणाऱयास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव आहे.

अनिल शर्मा (रा. दिल्ली) हा आज दुपारी 3.45 दिल्ली सचिवालयात आला होता. तो केजरीवाल यांच्या कार्यालयाबाहेर बसला होता. केजरीवाल हे जेवण करण्यासाठी कार्यालयाबाहेर आले, त्यावेळी त्याने केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकली. केजरीवाल यांच्या डोळ्यामध्ये काही प्रमाणात पावडर गेली. शिवाय, शर्मा याने केजरीवाल यांना धक्काबुक्की केली असून, गोळीबार करण्याचीही धमकी दिली. झटापटीमध्ये केजरीवाल यांचा चष्मा फुटला आहे. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी अनिल शर्माला ताब्यात घेतले.

दरम्यान, शर्मा हा मिरची पावडर घेऊन सचिवालयात कसा पोहोचला, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्यात तो यशस्वी झाल्याने दिल्ली पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला आहे. यापूर्वी त्यांच्यावर शाईफेक, चप्पल फेकल्याचा प्रकारही घडला होता.

आम आदमी पक्षाचे माजी नेते कपिल मिश्रा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक जवळ आल्या की केजरीवाल यांच्यावर असे हल्ले होतात, असे विधान करत त्यांनी या हल्ल्यावर शंका उपस्थित केली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live