दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 जुलै 2019

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजारपणामुळे निधन झाले.

गेल्या अऩेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च 1938 मध्ये झाला होता. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून 15 वर्षै त्या विराजमान होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सदस्या म्हणून त्यांची ओळख होती. 1998 पासून तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण 15 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु 2013 दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालनी दीक्षित यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केले. त्यानंतर त्या पक्षसंघटनेत काम करत होत्या.

Web Title: Delhi Congress chief Sheila Dikshit passes away

संबंधित बातम्या

Saam TV Live